मजुरी त्वरित देण्याची खासदार नेते यांच्याकडे मागणी
कुरखेडा : दोन वर्षापासून वनविभागाकडे प्रलंबित असलेल्या वनमजुरांची मजुरी मिळत नसल्याने वनमजुर आर्थिक संकटात सापडले आहेत. वनमजुराची मजूरी त्वरित मिळवून द्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुरखेडा परीक्षेत्राअंतर्गत गोठणगाव-कुरखेडा उपक्षेत्रात ग्रीन इंडिया मिशन योजनेअंतर्गत सन 2019 -20 मध्ये रोपवन घेण्यात आले होते. मजुरांकडून रोपवनची कामे करून घेण्यात आली. मात्र जवळपास शेकडो मजुरांची लाखो रुपयांची मजुरी देण्यात आली नाही. प्रथम वर्षी झालेल्या निंदणी, मरअळ भरणे, रोपवन संरक्षण आदी कामाची मजुरी अद्यापपर्यंत देण्यात आली नाही. वनविभागाकडुन सदर कामाची धनादेशाद्वारे वारंवार मागणी नोंदवण्यात आली. मात्र मजुरी निधी उपलब्ध झालेला नाही. सदर कारण पुढे करून मजुरांची आर्थिक अडचणी दुर केली जात आहे. सदर कामे करुन दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत. झालेल्या कामाची मजुरी मिळविण्याकरिता मजुर वारंवार वनविभागाकडे चकरा मारत आहेत. मजुरांची आर्थिक अडचण लक्षात घेता, त्यांची मजुरी त्वरित देण्यात यावी, अशी मागणी चांगदेव फाये यांनी खासदार अशोक नेते यांना भेटुन निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सह युवा मोर्चा तालुका महामंत्री उल्हास देशमुख, भाजयुमो जिल्हा सचिव प्रशांत हटवार, शोयब पठाण व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments