गडचिरोली : राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग , भारत सरकार ,नवी दिल्ली व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या २७ सप्टेंबर रोजी, सकाळी ११ वाजता 'स्वातंत्र्य संग्रात अनुसूचित जनजाती नायकांचे योगदान' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तर मुख्य अतिथी म्हणून माजी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य , रा.तु.म.नागपूर , विद्यापीठ, नागपूर दिनेश शेराम , विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, मुख्य वक्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रा. डॉ. शामराव कोरेटी, वक्ते राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग भारत सरकार नवी दिल्लीचे प्रा. विवेकानंद नरताम आदींची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी केले आहे.
0 Comments