युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा


भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांचे प्रतिपादन


सावलखेडा अंगणवाडी सेविकांचा सत्कार व विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण 

कुरखेडा: गावाच्या  विकासाच्या दृष्टिकोनातून युवकांचा सहभाग महत्वाचा असुन युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी केले.
ते तालुक्यातील सावलखेडा येथे श्री बाल  उत्सव मंडळ यांच्या वतिने आयोजित केलेल्या अंगणवाडी सेविका सत्कार तथा विविध स्पर्धा कार्यक्रमाचे बक्षिस वितरण कार्यक्रम मध्ये अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन माजी जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम तर प्रमुख अतिथी म्हणून माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष काशीनाथ दोनाडकर माजी सरपंच पुरषोत्तम दडमल ग्रामीण बँकेचे कँशियर राठी ग्राम पंचायत उपसरपंच सावित्राबाई राऊत गुणवंत दडमल  राऊत  अमिताब जनबंधु देवराव ढोंगे भाजयुमो तालुका महामंत्री उल्हास देशमुख भाजयुमो तालुका उपाध्यक्ष मोनेश मेश्राम गेडाम व सावलखेडा येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


याप्रसंगी अंगणवाडी सेविका कामिना लोणारे अंगणवाडी सेविका शामलता मडावी आशा वर्कर देवागंणा चौके यांचा मंडळाच्या वतिने शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध स्पर्धा चे बक्षिस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी भाग्यावान टेकाम काशीनाथ दोनाडकर कँशियर राठी उपसरपंच सावित्री राऊत गुणवंत दडमल यांनीही आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रम यस्ववीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष रोहित येरचे सचिव प्रमोद साखरकर उपाध्यक्ष अविनाश बुल्ले सदस्य अविनाश दाणे रितीक ढोक सौरव कुमरे सुमित मेश्राम अरविंद दाणे रोहित झुरे प्रकाश वाकडे सुहाग मडावी गुलाब डोमळे प्रफुल बुल्ले तुषार मेश्राम विशाल लोणारे ओमश्री मडावी व मंडळातील सदस्य गण व गावकरी मंडळी यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला युवक बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments