निवेदन व पाठपुरावा करूनही शहरातील समस्या मार्गी न लावल्यास १६ सप्टेंबरला नगर परिषदेला ठोकणार कुलूप
गडचिरोली, गडचिरोली नगर परिषदेच्या भोंगळ व उदासिन कारभारामूळे गोकुलनगर वखार महामंडळाच्या तिन महिण्याआआधी केलेल्या डांबरी रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन व वारंवार पाठपूरावा करून सुद्धा कोणतीच उपाययोजना केली नाही त्यामूळे काल खड्ड्यात टू व्हिलर जाऊन कोसळली व एका तरूणाचा जीव गेला त्यामूळे स्वत: वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावरील खड्डे बुजवा मोहिम राबवून सदर रस्त्यावरील खड्डे कॉंक्रिटने बुजविले.
यावेळी नगर परिषद प्रशासनाचा निषेध करण्यात आला व या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून संबंधीत कत्रांटदारावर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच नगर परिषदेतील प्रशासकिय अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली .
गडचिरोली शहरातील वेगवेगळ्या समस्यांचा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पंचनामा करून नगर परिषदेला निवेदन देण्यात आले व शहरातील समस्यांचे सर्वे करून समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे अल्टिमेटम देण्यात आले होते परंतु दहा दिवस उलटूनही नगर परिषद प्रशासनाने कोणतेही पाऊल उचललेले नाही त्यामूळे १६ सप्टेंबर रोजी नगर परिषदेला ताळे ठोकण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी यावेळी दिली आहे.
खड्डे बुजविण्याच्या मोहिमेत महासचिव योगेंद्र बांगरे, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, बाशिद शेख , जावेद शेख , तुळशिराम हजारे , भोजराज रामटेके, भारत रायपूरे, मनोहर कुळमेथे, भैयाजी कालवा, आदिसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments