तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये नांझा आश्रमशाळेला माधमिक विभागातून प्रथम क्रमांक Lokpravah



नांझा : पंचायत समिती कळंब अंतर्गत 6 व 7 सप्टेंबर 2022 रोजी ऑनलाईन व ऑफलाईन तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धा गटससाधन केंद्र कळंब येथे आयोजिय करण्यात आली होती. या विज्ञान स्पर्धेमध्ये 9 ते 12 माध्यमिक विभागातून पंचायत समिती कळंब तालुक्यातून शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळा नांझा  शाळेने प्रथम क्रमांक पटकवला. विज्ञान प्रदर्शनी सादर करणारी विद्यार्थिनी कुमारी सुजाता विकास आत्राम इयत्ता 10 वी हिने पूर परिस्थितीची पूर्वसूचना देणारे संयंत्र याचा प्रकल्प सादर केला. प्रकल्प मार्गदर्शक म्हणून विज्ञान शिक्षक श्री पी एच जैन  आणि शिक्षक शिवम नक्कलवार तसेच सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. या सयंत्रामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यास एक तास अगोदर लाईट आणि साऊंड सेन्सर द्वारे पूर्वसूचना मिळते आणि त्यामुळे प्राण हानी आणि वित्त हानी होत नाही. शालेय विज्ञान प्रकल्पाचा शाळेला प्रथम क्रमांक आल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, व कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments