- 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर
गडचिरोली : मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या चामोर्शी बसस्थानक व मार्कंडादेव येथील बसस्टॅन्डचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्याकरिता आवश्यक असणारा निधी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नातून अखेर मंजूर करण्यात आलेला आहे.
चामोर्शी बसस्थानकाकरीता 3 कोटी तर मार्कंडा देव येथील बसस्टॅन्डकरिता 2 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे परिवहन विभागाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांची मुंबई येथे भेट घेऊन याबाबत विस्तृत चर्चा केली. मंजुर निधी लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. चामोर्शी बसस्थानकाच्या जागेची साफसफाई व लेवलिंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे. जमिनीचे मोजमाप व इतर तांत्रिक बाबीही पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आता लवकरच मंजुर निधी उपलब्ध होत असल्याने प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल, असा आशावाद आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments