घात की अपघात घटना संशयास्पद
कूरखेडा :तालूक्यातील गेवर्धा येथे जिल्हा मध्यवर्ती सह बैंक जवळ गेवर्धा- अरततोंडी बायपास मार्गावर आज सकाळी एका इसमाचा मृतदेह संशयास्पदरीत्या रस्त्याच्च्या कडेला आढळून आला तर त्याची सायकल घटणास्थळावरून अंदाजे ४०० मीटर अंतरावर झाडाला टेकून उभी होती. त्याचा अपघात झाला असावा असा प्राथमीक अंदाज असला तरी, घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे.
मृतकाचे नाव भिवा नवलू कूमरे (४५) रा अरततोंडी असे आहे. तो काल कूरखेडा येथील उपजिल्हा रूग्नालयात उपचार सूरू असलेल्या भाचीची भेट घेत परत रात्री गेवर्धा मार्गे सायकलने जात होताा. मात्र तो रात्री घरी पोहचला नाही .सकाळी या रस्त्याने फीरायला जाणार्याना डोक्याला व हातापायाला गंभीर दूखापत असलेला त्याचा मृतदेह संशयास्पद रीत्या रस्त्याचा कडेला दिसून आला तर त्याची सायकल घटणास्थळावरून अंदाजे ४०० मीटर अंतरावर एका झाडाला टेकून उभी होती. या मार्गावर रात्रीचा सूमारास मोठ्या प्रमाणात ट्रक्टर द्वारे रेती तस्करी होत असल्याची माहीती आहे. त्यामूळे ट्रक्टर ने धडक दिल्याने त्याचा मृत्यु झाला असावा असा अंदाज आहेे. मात्र त्याची सायकल घटणास्थळावरून काही अंतरावर सूस्थीतीत आढळून आल्याने प्रकरण संशयास्पद झाले आहे. घटनेची माहीती मीळताच ठाणेदार अभय आष्टेकर, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे,शितल माने व पोलीस दलाने घटणास्थळ गाठत बारकाईने घटनेचा पंचनामा केला व प्रेत ताब्यात घेत उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रूग्नालय कूरखेडा येथे आणले मृतकाच्य मागे आई, वडील,पत्नी एक मूलगा एक मूलगी व बराच मोठा आप्तपरीवार आहे .
0 Comments