कुरखेडा :समस्त बौद्ध समाज व समता सैनिक दल तालुका कुरखेडा यांचे वतीने तपोभूमी विपश्यना साधना केंद्र परिसर कुरखेडा येथे अशोक विजयादशमी म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. सर्वप्रथम धम्म ध्वजाचे वंदन करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले .यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले या धम्मचक्र प्रवर्तन दिन ,अशोका विजयादशमी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आयु. संजय रामटेके साहेब कृषी अधिकारी तालुका कुरखेडा आयु प्रल्हाद कराडे माजी जीप सदस्य आयु. महेंद्रजी माने समाजसेवक तथा संस्था चालक ,आयु डोंगरवार साहेब एसबीआय मॅनेजर कुरखेडा ,आयु अशोक इंदुरकर सर माझी जि प सदस्य ,आयु डॉ.प्राध्यापक शेंडे सर आयु. चरण कराडे ,आयु हिरा वालदे विमा अभिकर्ता, मेजर सहारे ,दिलीप सहारे खेमराज धोंडण, उद्धव लाडे लताबाई सहारे त्याचप्रमाणे तालुक्यातील मौजा तळेगाव ,कुंभिटोला मोहगाव ,वडेगाव, पलसगड इत्यादी गावातून बौद्ध उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता बौद्ध समाज कुरखेडा तथा समस्त समता सैनिक दल कार्यकर्ते यांनी मोलाचे योगदान दिले मोलाचे योगदान दिले.
0 Comments