प्रत्येकाने लावलेले रोपटे स्वतः वाढवायचे : प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे lokpravah.com



गडचिरोली : एखादे रोपटे लावल्यानंतर त्याचे संगोपन आणि संवर्धन केल्यानंतर जो आत्मिक आनंद मिळतो तो पराक्रोटीचा असतो त्या रोपट्यावर हात फिरवल्यानंतर ते आपल्याशी संवाद साधू लागते.ही रोज घडतेआणि यातून मिळणारे समाधानही महत्त्वाचे आहे.हा आनंद आपल्याला इतर कुठल्याही कामातून मिळत नाही .
प्रत्येकाने लावलेले रोपटे स्वतः वाढवायचे त्याचे संवर्धन देखील स्वतः करायचे ते वाढवण्याची जबाबदारी त्याची आहे असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यापीठ परिसरात रोपटे लावले त्यावेळी केले.

विद्यापीठातील प्रत्येकाने 'ग्रीन कॅम्पस ' या चळवळी अंतर्गत विद्यापीठ परिसरात वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करायचे आहे आणि त्याचे संवर्धन स्वतः करायचे आहे. 'स्वच्छ परिसर हिरवा परिसर' ही या उपक्रमाची संकल्पना आहे. यावेळी अधिसभा सदस्य रुपेंद्र कुमार गौर , संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ. श्याम खंडारे , समन्वयक डॉ. प्रमोद जावरे तसेच इतर कर्मचाऱ्यांची  उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments