सिरोंचा शहरातील विविध वॉर्डांना भेटी
सिरोंचा : येथील नगर पंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी शहरातील प्रत्येक वॉर्डांना तसेच शारदा मंडळाला भेट देत वार्डातील समस्या जाणून घेतल्या.
सिरोंचा शहरातील अनेक वार्डात शारदादेवीची स्थापना करण्यात आली आहे. नगर पंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा, सभापती व नगरसेवकानी सिरोंचा शहारातील प्रत्येक शारदा मंडळाला भेट देत त्या-त्या वार्डातील समस्या जाणून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने नाली सफाई, पथदिवे, फवारणी, नाली बांधकाम, आरोग्य, रस्ते आदी समस्यांचा समावेश आहे. सदर समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन नप उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी वार्डातील नागरिकांना दिले.
बतकम्मा उत्सवासाठी केली विद्युतची व्यवस्था
दरम्यान, आज बतकम्मा उत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने वॉर्डातील बतकम्मा लावण्याचा ठिकाणी नपंकडून विद्युत रोषणाई आणि पाण्याची व्यवस्था केल्याची माहिती उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी दिली. शहरातील वॉर्डांना भेट देऊन नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्याने नगर पंचायतप्रती नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी बांधकाम सभापती नरेश अलोने, नगरसेवक भवानी गणापूरपू, मारोती गणापूरपू, नागेश दुग्याला, शैलेंद्र मुत्याला, सुरेश मल्लमपल्लीसह शहरातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments