माजी आमदार दिपक आत्राम यांनी घेतली डॉ.आमटे दाम्पत्याची भेट lokpravah.com

डॉ. प्रकाश आमटे यांच्या तब्बेतीची माजी आमदारांकडून आस्थेने विचारपूस



भामरागड : हेमलकसा येथील  डॉ.रमण मॅगसेसे व पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध डॉ. प्रकाश आमटे व त्यांची धर्मपत्नी डॉ.मंदाकिनी आमटे या दाम्पत्याची आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्यातीची आस्थेने विचारपूस केले. डॉ.प्रकाश आमटे यांनी नुकताच  कर्करोगावर मात करून पुण्याहून हेमलकसा ला परतले होते. माजी आमदार आत्राम यांनी आपल्या  भामरागड दौऱ्याप्रसंगी हेमलकसा येथे जाऊन डॉ.आमटे दाम्पत्याची भेट घेऊन त्यांच्या तब्यतीची आस्थेने विचारपूस करून डॉ.आमटे दाम्पत्याची त्यांनी आशीर्वाद घेतले.

यावेळी डॉ.आमटे दाम्पत्यानी माजी आमदार आत्राम यांना पुढील राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा दिले.

हेमलकसा येथे डॉ.आमटे दाम्पत्याची भेटी दरम्यान माजी आमदार आत्राम यांचे सोबत आल्लापल्लीचे माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,संदीप बडगे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments