त्वरित नुतनीकरण करण्याची माजी जिप सदस्य प्रभाकर तुलावी यांची मागणी
कुरखेडा : तालुक्यातील कुरखेडा ते तळेगाव या मार्गावर अनेक गावे येतात. खेडेगाव आणि गोंदिया जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्तावरुन मार्गक्रमण करण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. खराब रस्त्यामुळे अपघाचे प्रमाणही वाढले आहेत. त्यामुळे कुरखेडा-तळेगाव रस्त्याचे त्वरित नुतनीकरण करावे, अशी मागणी माजी जिप सदस्य प्रभाकर तुलावी यांनी केली आहे.
या रस्तावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत या खड्डांमध्ये पाणी साचुन राहत असल्यामुळे रस्तावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती दिसुन येते. या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. खराब रस्त्यामुळे दोन-तिन अपघात झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले .
तालुक्यातील मुख्य गाव असलेल्या तळेगावकडे जाणारा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असतो. अनेक महिण्यांपासून या रस्ताची दुरावस्था असुन सुध्दा या रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुलर्क्ष आहे.
त्यामुळे संबधित विभागाने रस्ताची समस्या लक्षात घेवुन तत्काळ रस्त्याचे नुतनीकरण करावे, अशी मागणी माजी जिप सदस्य प्रभाकर तुलावी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
0 Comments