विवाहित महिलेच्या खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक lokpravah.com

सिरोंचा तालुक्यातील मेडाराम येथील घटना



सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील मेडाराम गावात एका विवाहित महिलेची हत्या करून फरार झालेल्या आरोपीस पकडण्यात सिरोंचा पोलिसांना यश आले आहे. शनिवारी पोलिसांनी फरार आरोपी पवनकुमार येनगंदुलाला अटक केली आहे. रविवारी त्याला अहेरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 13 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. 

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दुर्गा विसर्जनादरम्यान विजया मुंदाळे नामक महिला आपल्या घरात अंघोळ करीत होती. दरम्यान, आरोपी पवनकुमारने घरात घुसून महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून ठार केले. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. सिरोंचा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीची शोधमोहीम सुरु केली. दरम्यान शनिवारी पवनकुमार तालुक्यातील कारसपल्ली नाल्याजवळ निलगिरीच्या बागेत लपून बसला असल्याची गुप्त माहिती सिरोंचा पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे सिरोंचा पोलिसांच्या पथकाने पवनकुमारला अटक केली. तसेच रविवारी आरोपीला अहेरी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रकरणाचा पुढील तपास सिरोंचा पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments