श्री गुरुदेव सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ जांभूडखेडा यांचा पुढाकार
कुरखेडा : नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर जांभुळखेडा येथे दुर्गा मातेच्या गोपालकाला प्रसंगी गावात सेवा देणारे सिंचन विभागातील अधिकारी एम.एन.कुंभारे, विद्युत विभागातील कर्मचारी पठाण तर वन विभागातील मोहुर्ले मॅडम वनरक्षक यांचा गुणगौरव करीत शाल श्रीफळ व पुषपगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेव भाऊ फाये,कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अभय आष्ट्टेकर, उपनिक्षक नारायन शिंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे प्रा. विनोद नागपूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच गणपत बनसोड यांनी केले तर आभार गाहने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गुरुदेव सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ जाभूडखेडा येथील समस्त सदस्य गन यांनी सहकार्य केले.
0 Comments