रॅलीदरम्यान केली नाश्ता व पाण्याची व्यवस्था
गडचिरोली : वर्षावास समारोपीय कार्यक्रमाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीने जश्न ए ईद दिनानिमीत्त मुस्लिम बांधवांनी शहरात काढलेल्या रॅलितील समाज बांधवांचे गुलाब पुष्पाने स्वागत केलेे. रॅलीदरम्यान नाश्ता व पाणी बाटलचेे वाटप करण्यात आले.
बौद्ध धम्मात व कुराणात दानाला खुप मोठे महत्व असल्याने सदर उपक्रम राबविण्यात आल्याचे वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, महासचिव योगेंद्र बांगरे, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, भोजराज रामटेके, भारत रायपूरे, विश्वनाथ बोदलकर, मनोहर कुळमेथे आदि होते तर ईमाम( जामा मस्जिद) मौलाना मो. जहांगिर आलम, जामा मस्जिद प्रेसिडेंट अब्दुल रहीम शेख शहादत खान, वसीम खान, गुलाम जाफर, सलमान शेख, लतीफ भाई लियाकत अली, शैबाज शेख इमरान शेख, बाशिद शेख, जावेद शेख , आरिफ पठाण आदि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने रॅलित सहभागी होते.
0 Comments