अतिदुर्गम भागातील शेकडोंनी घेतला रोगनिदान शिबिराचा लाभ lokpravah.com

लायड्स मेटल्स कंपनीचा पुढाकार



एटापल्ली : अतिदुर्गम व दुर्गम भागातील रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी एटापल्ली तालुक्यातील तोडसा येथील शासकीय आश्रम शाळेत लाईड्स मेटल्स कंपनीच्या वतीने भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. 

या शिबिराचे उदघाटन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी शूभम गूप्ता, सरपंच प्रशांत  आत्राम, लायड्स मेटल्स कंपनीचे व्यवस्थापक साई कुमार, गणेश शेट्टी, डॉ.गोपाल रॉय, डॉ. सलूजा, बलराम सोमनानी, वेदंश जोशी यांच्यासह कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते. परिसरातील नागरीक विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी मोठ्या रुग्णालयात जाऊ शकत नाही. त्यामुळे रुग्णांवर मोफत व योग्य उपचार व्हावे, यासाठी लायड्स मेटल्स कंपनीतर्फे रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रुग्णांच्या तपासणीसाठी 16 ते 17 तज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच गंभीर आजार दिसून आल्यास संबंधित रुग्णांवर कंपनीच्या खर्चातून उपचार करण्यात येणार आहे. परिसरातील गरजूंनी शिबिराचा लाभ घेऊन  आपले आरोग्य तपासून घेण्याचे आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. सोबतच शालेय विद्यार्थ्यांना व्हालीबाल, फूटबाल, किक्रेट व कॅरम आदी खेळांच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments