गडचिरोली : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी श्री काशी विश्वनाथ नगरीचा विकास केला. त्याच धर्तीवर मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिर पर्यटन विकासाचा लोकार्पण सोहळा उजैन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पार पडला. त्याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या शहरासह गावा-गावातील शिव मंदिरात जाऊन शिवशंकराची पूजा- अर्चा करणे सुरू आहे.
त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने आज गडचिरोली शहरालगतच्या चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थान येथील शिव मंदिरात जाऊन शिवशंकराची महापूजा गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी पूजा-अर्चा, पुष्पहार अर्पण करून शिवशंकर- महादेवाची महापूजा केली व दर्शन घेतले.
यावेळी माजी नगरसेवक तथा भाजपचे गडचिरोली शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर, माजी नगरसेवक केशवजी निंबोड, माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम,माजी नगरसेवक लताताई लाटकर, माजी नगरसेवक अलकाताई पोहनकर, माजी नगरसेवक निताताई उंदिरवाडे, आदिवासी मोर्चा च्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई शेडमाके, भाजयुमो चे शहर महामंत्री हर्षल गेडाम शहर सचिव प्रा. चंद्रशेखर गडसूलवार, भाजपच्या कोमल बारसागडे, पूनमताई हेमके, पिंकीताई कन्नाके, देवाजी लाटकर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments