प्राथमिक आरोग्य केंद्र अडपल्ली माल येथे रक्तदान शिबिर lokpravah.com

 16 रक्तदात्यांनी स्वइच्छेने केले रक्तदान


गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील अडपल्ली माल येथे शारदा देवी उत्सवानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून सामाजिक बांधिलकी जोपासत 16 रक्तदात्यांनी स्वइच्छेने रक्तदान केले. शिबिराचे उद‌घाटन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वेद्यकीय अधिकारी डॉ. चेतन आकरे यांनी केले. यावेळी फार्मसी ऑफिसर असोसिएशनचे कार्याध्यक्ष तथा औषध निर्माण अधिकारी परेश कोल्हे यांनी रक्तदानाचे महत्व समजावून सांगितले. रक्तदान शिबिराला जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेटी चमूने सहकार्य करून रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते विपूल चकवर्ती, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी अनिल भुरले, आरोग्य सहाय्यक हर्षद बारसागडे, सोनल अलोने, चेतन मडावी, चुणारकर, कंकाल, धुमने, पूनम चरडुके,जया पुंघाटी, कमल वनकर आदिंनी सहकार्य केले.


Post a Comment

0 Comments