कुरखेडा नगरपंचायत राष्ट्रपतीकडून पुरस्काराने सन्मानित lokpravah.com



कुरखेडा :      केंद्र शासनाने १ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छ भारत अभियानाचा निकाल जाहीर केला. यामध्ये १५ हजार ते ५० हजाराच्या आत लोकसंख्येच्या स्वच्छ शहर नागरिकांच्या अभिप्राय श्रेणीत कुरखेडा नगरपंचायतीला पुरस्कार मिळाला आहे. दिल्ली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, केंद्रीय नगर सचिव मनोज जोशी, सहसचिव रुपा मिश्रा यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

       हा पुरस्कार  कुरखेडा  नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.माधुरी सलामे , नगराध्यक्षा आनिता बोरकर , तांत्रिक तज्ञ अभिलाष अलोने , अधिक्षक प्रविण गिरमे , शहर समन्वयक समीर नंदेश्वर , लेखापाल स्वप्निल निलगिलवार यांनी स्वीकारला.  सन २०२२ मध्ये मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांच्या मार्गदर्शनाखाली

विभागातील कर्मचारी नगरपंचायत नियमित व कंत्राटी सफाई कर्मचारी यांच्यासोबत योग्य नियोजन करून कुरखेडा नगरपंचायतने स्वच्छतेच्या कामांकरिता अविरत मेहनत घेतली. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये कुरखेडा नगरपंचायतने देशात पश्चि विभागातून पुरस्कार पटकाविला. स्थानिक नागरिकांना स्वच्छतेविषयी जागृत राहून शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी समजल्यास कुरखेडा शहर येत्या काळात कचरामुक्त व प्लास्टिकमुक्त  होण्यास मदत मिळणार आहे. स्वच्छतेत देखील उत्तम स्थान मिळवू राज्यातून सर्वात स्वच्छ व सुंदर शहर  बनविण्याचा मानस असल्याचे मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांनी व्यक्त केले .

Post a Comment

0 Comments