हक्काचा लढा उभारण्यावर विचारमंथन!
एटापल्ली : तालुक्यातील जांबिया ग्रामपंचायत क्षेत्रातील अडंगे येथे अतिक्रमण धारक शेतजमिनीचे प्रलंबित वनहक्क दाव्यांना शासनस्तरावरून मंजुरीच्या मागणीसाठी पाठपुरावा व आंदोलनात्मक लढा तीव्र करण्यावर विचारमंथन करण्यात आले आहे.
आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी मूलनिवासी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोहर बोरकर, प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील दोहे हेडो, उपाध्यक्ष राजू पुंगाटी, दत्तू उसेंडी, सचिव दीपक मडावी प्रामुख्याने उपस्थित होते, अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी ( वनहक्काची मान्यता ) अधिनियम २००६ व नियम २००८ नुसार, आदिवासी शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित अतिक्रमित शेतीचे वनहक्क दावा प्रस्ताव शासनाच्या वनहक्क समितीकडे नऊ वर्षापासून प्रलंबित आहेत, शासन व प्रशासन स्तरावरून प्रलंबित दावे प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही मान्यता देण्यात चालढकल केली जात आहे.
अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडे अतिक्रमीत शेती शिवाय दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने अतिक्रमीत शेतीचे प्रलंबित वनहक्क दावे मंजूर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन उभारण्यावर सभेत ठराव संमत करण्यात आले आहे. यावेळी मूलनिवासी हक्क संघर्ष समितीचे विनोद दुर्वा, देऊ गावडे, मनोज वेलादी, रामजी गोटा, दीपक केरकट्टा, गोमाजी आतलामी, दुलसा हिचामी, बंडू हेडो, यशवंत कोवशी, नंदू पुंगाटी, भीमा आरकी व अतिक्रमण धारक आदिवासी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते,
0 Comments