छत्रपतींच्या अपमानाने संतप्त कांग्रेस- राष्ट्रवादीची निदर्शने
कूरखेडा : तालूका कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्च्या वतीने आज मंगळवार दिनांक २२ नोव्हेंबरला येथील फव्वारा चौकात निदर्शने करीत महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणार्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा तसेच या विकृत मानसिकतेला पाठीशी घालणार्या भाजप शासनाचा सूद्धा निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्तांकडून तिव्र शब्दात होणार्या नारेबाजीने फव्वारा चौक गजबजला होता.
आंदोलनात कांग्रेस तालुका अध्यक्ष जीवन नााट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष राम लांजेवार, महिला कांग्रेस अध्यक्ष आशाताई तूलावी, माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी, माजी जि प सदस्य प्रल्हाद कराडे, सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक निताराम कूमरे, आनंदराव जांभूळकर यूवक कांग्रेस ता अध्यक्ष गिरीधर तितराम उपाध्यक्ष रूखसार शेख, अल्पसंख्यक कांग्रेस ता अध्यक्ष जावेद शेख उपाध्यक्ष शोएब मस्तान,आविका अध्यक्ष धरमदास उईके नगरपंचायत सभापति हेमलता नंदेश्वर माजी सभापति संध्या नैताम माजी नगरसेवक उसमान पठान, राजू रामटेके, आसाराम कूरंजेकर प्रभाकर जूमनाके,रियाज़ शेख,पूरषोत्तम मडावी,अगरसिगं खडाधार, संजय कोरेटी,तूकाराम मारगाये,उद्धव कापगते, रमेश टिकले, शेषराव नैताम,दादाजी आळे, श्रीराम गायकवाड, शांताबाई हलामी,संगीता मडावी,कूसूम ठलाल, मंगेश वालदे,अरूण नैताम,प्रितम सूरणकर, माधूरी चौधरी,रमशिला गूवाल,वंचला कसारे व कांग्रेस राष्ट्रवादी चे कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थीत होते. यावेळी पोलीसांचा चोख बंदोबस्त होता .
0 Comments