कुरखेडा : स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे तहसील कार्यालय कुरखेडा तर्फे मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी तहसीलदार यांनी निवडणूक आयोगांतर्गत नवीन मतदारासाठी नाव समाविष्ठ करण्यासाठी विद्यार्थ्यांना नवीन नवीन मतदारासाठी अर्जाचा नमुना , Votar Helpline Apps तसेच इतर प्रमाणपत्रा विषयी आणि राज्य लोकसेवा आयोगच्या परीक्षेविषयी तहसीलदार यांनी माहिती दिली .
या कार्यक्रमाभेटी दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य आनंदराव गेडाम साहेब यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव समाविष्ठ करण्याची सूचना दिली .
या कार्यक्रमाला तहसील कार्यालयाचे नायब तहीसिलदार चकोले साहेब , अविनाश चुने साहेब निवडणूक विभाग , शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक के.ए.कोल्हे , व्ही.आर.मेश्राम , व्ही.एस.गलबले , एस.बी.काळे , एम.एस.सराटे , के.पी.सोरते , जी.एम.शेंडे , एम.एम.राउत , आर.जे.भोयर व शिक्षकेत्तर कर्मचारी अनिल बांबोळे , कालिदास मलोडे , शिवा भोयर , घनश्याम भोयर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 Comments