संविधान गौरव दिनानिमीत्यचा सम्यक - वंचितचा उपक्रम
गडचिरोली : सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव दिन निमीत्ताने शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजीत वक्तृत्व स्पर्धेतील पहिले बक्षिस गोंडवाना विद्यापिठात पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेला प्रलय श्याम मशाखेत्री याने तर नवजीवन पब्लिक स्कुल मधील इयत्ता सातवीतील निशांत तुलावी याने दुसरा बक्षिस तर याच शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असलेली सिमा श्रिकोंडावार हिने तिसरा बक्षिस पटकाविले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा डॉ नामदेव खोब्रागडे होते, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव योगेंद्र बांगरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या जिल्हा निमंत्रक सोनम चौधरी, महिला आघाडीच्या मालाताई भजगवळी, उपाध्यक्ष जी के बारसींगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, उपाध्यक्ष तुळशिराम हजारे आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर वक्तृत्व स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून भिमराव शेंडे, अविनाश उराडे, नमिता वाघाडे यांनी भूमिका निभावली.
कार्यक्रमाची सुरूवात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून दिप प्रज्वलनाने करण्यात आली. स्पर्धे नंतर उपस्थित पाहुण्यांनी समायोचीत मार्गदर्शन केले व नंतर बक्षिस वितरण करण्यात आले. या वक्तृत्व स्पर्धेत शहरातील बारा शाळेतील एकूण बत्तीस स्पर्धकांनी भाग घेतले होते. पहिले बक्षिस प्राप्त करणा-या स्पर्धकांना पाच हजार रोख व संविधान ग्रंथ व दुसरे बक्षिस तिन हजार रोख व संविधान ग्रंथ तर तिसरे बक्षिस दोन हजार रोख व संविधान ग्रंथ असे स्वरूप होते.
बक्षिस वितरण उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रत्येकी दोनशे रूपयाचे पारितोषीकही देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सम्यक लिद्यार्थी आंदोलनाचे निमंत्रक शुभम भैसारे यांनी केले तर आभार सोनलदिव देवतळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जावेद शेख, भारत रायपूरे, मनोहर कुळमेथे, दिक्षा तेलकापल्लीवार,प्रांजली देवतळे, दिक्षा गेडाम यांनी अथक परिश्रम केले.
0 Comments