विद्यार्थ्यांनी स्वावलंबी शिक्षण घेवून स्वतःच्या पायावर उभे राहावे; शिक्षणाधिकारी आर.पी. निकम यांचे प्रतिपादन Education Officer Nikam



 कुरखेडा : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरिता तंत्रज्ञान शिक्षण घेऊन स्वतःचे आयुष्य घडविता येते. याकरिता विद्यार्थ्यांनी स्वालंबित शिक्षण घेऊन स्वतःचा भवितव्य घडवावा, असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी केले. ते श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे अटल टिंकरिंग लॅब व स्वर्गीय.जे.टी. पाटील म्हशाखेत्री स्मृती सभागृहच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटक स्थानावरून बोलत होते. 

यावेळी अध्यक्ष म्हणून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटिल  म्हशाखेत्री तर  प्रमुख अतिथी  म्हणून  श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोविंदरावजी बाणबले,  सदस्य डी.एन.चापले, हर्ष लड्डा प्रमुख अटल लँब, विहिपचे जिल्हा अध्यक्ष वामनराव फाये, नगराध्यक्ष अनिता बोरकर, शिवाजी हायस्कूल कुरखेडाचे माजी मुख्याध्यापक श्री. दखणे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सौ. नाकाडे , सहसचिव मनोज अंबादे,  विद्यालयाचे प्राचार्य आनंदराव गेडाम, शाळेचे पर्यवेक्षक सी.एस. मुंगमोडे उपस्थित होते.

पुढे बोलताना निकम म्हणाले, अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान शिक्षण आत्मसात करून यशाची पायरी चढावी. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनील पाटिल म्हशाखेत्री, सचिव गोविंदराव बानबले, संस्था सदस्य डी .एन. चापले, अटल लॅब टेक्निशियन हर्ष लड्डा यांनीही मागदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आ. मो. गेडाम यांनी केले.  संचालन प्रा. के. ए. कोल्हे यांनी केले तर आभार सी. एन. नरूले  यांनी मानले. यावेळी  विद्यार्थी, पालक व शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments