कुरखेडा : दोन वर्षापासून वनविभागाकडे प्रलंबित असलेल्या रोपवन संरक्षक ,वन मजुरांची मजुरी मिळत नसल्याने वन मजुर आर्थिक संकटात सापडले होते. वनमजुरांनी आपल्या हक्काच्या मजुरी करीता धावपळ करीत होते. या प्रश्नाला घेवुन भारतीय जनता युवा मोचाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे यांच्या माध्यमातून वन मजुरांची आपबिती सांगून निवेदन सादर करून सात्तत्याने पाठपुरावा केला . त्यामुळे या पाठपुराव्याला यश येवुन वन मजुरांची मजुरी देण्याची कारवाई वनविभागामार्फत करण्यात आली. दोन वर्षापासुन प्रलबिंत रक्कम मिळाल्याने मजुरांनी आनंद व्यक्त केला. शुक्रवार ९ डिसेंबरला वन अधिकारी , कर्मचारी यांच्या उपस्थितीत भाजयुमो जिल्हा अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक एम एल किनेकर, वनरक्षक पी. के शेख, जांभुळखेडाचे वनरक्षक उत्तरा मोहुर्लै, चांदागड वनरक्षक सुप्रिया दुर्गै, नचिकेत कुत्तरमारे, भजन वाघाडे, आनंदराव राऊत, भाऊराव पत्रे, गुरुदेव हिडामी, सुधाकर तुलावी, जितेद्र अवरासे, रामजी देव्हारे, जनार्धन राऊत, संजय दोनाडकर, वनविभागाचे कर्मचारी व मजुर उपस्थित होते.
कुरखेडा वनपरीक्षेत्रां अंतर्गत गोठणगाव कुरखेडा उपक्षेत्रात ग्रीन इंडिया मिशन योजनेअंतर्गत सन 2019 -20 मध्ये रोपवन घेण्यात आले होते सदर रोपवनात मजुरांकडून रोपवनची कामे करून घेण्यात आली आले माञ जवळपास शेकडो मजुरांची लाखो रुपये मजुरी देण्यात आले नाही, प्रथम वर्षी झालेले निंदणी कामे मरअळ भरणे ,रोपवन संरक्षण इत्यादी कामाची मजुरी अद्याप पर्यंत वाटप करण्यात आले नाही,वनविभागाकडुन सदर कामाची धनादेश मागणी द्वारे वारंवार मागणी नोंदवण्यात आली असून सुद्धा मजुरांची मजुरी निधी उपलब्ध झालेला नाही हे कारण पुढे करून मजुराची आर्थिक अडचणी दुर केल्या जात नसल्याचे दिसत आहे., सदर कामे करुन दोन वर्ष पूर्ण झालेले होते झालेल्या कामाची मजुरी मिळविण्याकरिता मजुर सारखा वन विभागाकडे चकरा मारत होते .परंतु दोन वर्षापासून प्राप्त झाली नाही .त्यामुळे मजुरांना मजुरी तात्काळ वितरीत करण्याचे आश्वासन अनेकदा देण्यात आले होते .परंतु मजुरांना मजुरी मिळायला बराच विलंब होत होते . त्यामूळे उपोषणाला बसण्याची तयारी मजुरांनी दर्शवली.
मागिल दोन वर्षापासून वनविभागाकडे वनमजुरांची मजुरी प्रलंबित असल्याने वनमजुरांवर आर्थिक अडचणी निर्माण झाली असून वनमजूर आर्थिक संकटात सापडले आहेत. यामूळे काही दिवसापुर्वी कुरखेडा येथील वन परिक्षेत्र कार्यालय समोर रखरखत्या उन्हात वनमजुर उपोषणाला बसले या उपोषण आंदोलनात उपविभागीय वन अधिकारी एम एन चव्हाण व वनपरिक्षेत्र अधिकारी कुंभलकर यांनी शासनस्तरावरून हा प्रश्न रखडलेला असून शासन स्तरावर निधी उपलब्ध नसल्याने खात्यावर जमा करण्यात आली नाही, निधि आल्यानंतर लगेच आपल्या खात्यात पैसे टाकल्या जाईल तुमच्या प्रलंबित असलेल्या मजुरीचा पाठपुरावा आम्ही शासन स्तरावर केला आहे.असे लिखित आश्वासन उपयोगी उपविभागीय वन अधिकारी एम एन चव्हाण, व वनपरिक्षेत्र अधिकारी एम,डी कुंभलकर यांनी दिल्यानंतर उपोषण कर्त्याने उपोषण मागे घेतले होते. पंरतु प्रश्न निकाली निघाला नाही ,
या मजुरांच्या उपोषण मंडपाला भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी भेट देऊन मजुरांच्या व्यथा समजून घेतल्या व मजुरांच्या मागण्या रास्त असून त्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात यावे याकरिता पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते त्या दृष्टिकोनातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेद्रजी वनमंत्री सुधिरभाऊ मुंनगटीवार खासदार अशोक नेते आमदार कृष्णाजी गजबे यांना भेटुन सदर समस्या सांगितले व निवेदन सादर करुन सातत्याने पाठपुरावा केला.
सर्व लोकप्रतिनिधी यांनी यांनी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केल्याने अखेर मजुरांची प्रलबिंत रक्कम प्राप्त झाली. व मजुरांना त्यांची प्रलबिंत मजुरी देण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे मजुरांनी आनंद व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक सुप्रिया दुर्गै तर आभार प्रदर्शन वनरक्षक उत्तरा मोहुर्ल यांनी केले,
0 Comments