उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला भरधाव बसची धडक ; महिला गंभीर lokpravah.com



गडचिरोली : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला भरधाव एसटी बसची जबर धडक बसल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज 6 डिसेंबरला सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास धानोरा मार्गावरील हॉटेल सिटी हॉर्ट जवळ घडली. जखमी महिलेचे नाव ज्योती सोनुले वय 32 असे आहे. जखमी महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


प्राप्त माहितीनुसार, धानोरा मार्गावरील सीटी हॉर्ट जवळ उभ्या असलेल्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच 34 बीएफ 9461 ला गोडलवाही वरून धानोरा मार्गे गडचिरोलीला येणा-या एसटी बस क्रमांक एमएच 40 वाय. 5495 ची जाेरदार धडक बसली. भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला धडक दिली. यात चारचाकी वाहन रस्त्यालगत असलेल्या झुडपात फेकल्या गेले. झुडपाजवळच असलेल्या मोठ्या झाडाला चारचाकी वाहन धडकले नसल्याने व झुडपातील जागा ओलसर असल्याने मोठी दुर्घटना टळली. बातमी लिहीस्तोवर कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Post a Comment

0 Comments