"डॉ. जगदीश बोरकर यांच्या प्रयत्नांना यश"
कुरखेडा : कढोली येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या शिवदास बेनिराम नेवारे या बालकाला दृष्टी दोष असल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता.
परंतु आता त्याला राष्ट्रीय बाल स्वास्थ National Child Health कार्यक्रम अंतर्गत शस्त्रक्रिया होवून दृष्टी मिळालेली आहे.
कढोली येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. राष्ट्रीय बाल स्वास्थ पथक उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा चे वतीने ही तपासणी आयोजित करण्यात आली होती. सादर तपासणी दरम्यान शाळेत अनुपस्थित असलेला शिवदास बेनिराम नेवारे या विध्यार्थ्याला घरून शाळेत बोलावून वैधकीय अधिकारी डॉक्टर जगदीश बोरकर यांनी तपासणी केली.
तपासणी नंतर त्याचे दोन्ही डोळ्याला दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिवदास ला बायलाटरल कॅट्रॅक्ट ही वैद्यकीय स्थिती असल्याचे प्राथमिक निदान झाले. त्याचा योग्य उपचार केल्यास त्याची दृष्टी परत येवू शकते असा विश्वास डॉक्टर बोरकर यांना होता. पुढील उपचारासाठी बाल स्वास्थ्य पथकाचे माध्यमाने संदर्भीत करून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेऊन नेत्र रोग तज्ञ मार्फत त्या बालकाची तपासणी केली असता त्यांनी यावर शस्त्रक्रिया करण्याचे सुचविले व नागपूर येथे हि जटिल शत्रक्रिया होईल असे सांगितले. नंतर शिवदास याला नागपूर येथे शस्त्रक्रिया करिता नेण्याचे ठरविण्यात आले.
सदर विध्यार्थी हा बाहेर जिल्हातील असून तो आपल्या आजी आजोबा कडे राहून शिक्षण घेण्यासाठी आला होता. शिवदास ची आई हि त्याला जन्म देऊन देवाघरी गेली. तर वडील हे अशिक्षित असल्याने ते हे सर्व अडचणीत शिवदास याचा उपचार योग्य करून घेतील का या बाबत शंकाच होती.
शिवदास ची आजी व आजोबा हे वृद्ध आहेत, अश्यात बालकासोबत राहण्यासाठी गावातील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व त्याचे एक नातेवाईक यांना तयार करून शाळेतील शिक्षकांचे मदतिने त्यांना राष्टीय बाल स्वास्थ पथक उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा चे वाहनाने स्वतः वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदिश बोरकर यांनी सूरज आय इन्स्टिट्यूट नागपूर येथे भरती केले.
त्यावर पहिल्यांदा एका डोळ्यावर व नंतर दुसऱ्या डोळ्यावर सुरज रुग्णालयध्ये तज्ञ वैद्यकीय चमू मार्फत मोफत शत्रक्रिया करण्यात आली. शत्रक्रिया यशस्वी होऊन बाल स्वास्थ पथकाच्या अथक परिश्रमामुळे शिवदासला दृष्टी मिळाली. जीवनात अंधाराचा काळोख आलेल्या शिवडासच्या जीवनात प्रकाशमय जीवन आले. आता शिवदास हा नियमित रोज कुणाचाही आसरा न घेता शाळेत येत आहे व शिक्षण घेत आहे .कमकुवत आर्थिक परिस्थिती मुळे पालक या बालकांवर शस्त्रक्रिया करू शकले नसते परंतु राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामुळे नवी दृष्टी मिळालेली आहे. सदर बालकावर शत्रक्रिया हि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल रुडे, डॉक्टर बागराज धुर्वे, डॉक्टर सोळंखी, उपजिल्हा कुरखेडा चे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमित ठमके यांचे मार्गदर्शनात बाल स्वास्थ्य चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदिश बोरकर यांनी करून घेतलेली आहे. शिवदास वर शस्त्रक्रिया करून घेणे करिता हेमलता सांगोळे ,प्रशांत खोब्रागडे औषध निर्माण अधिकारी धम्मप्रिया झाडे,परिचारिका टिकेश्वरी करमकार ,वसीम शेख आदींचे खूप सहकार्य लाभले आहे. कढोली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पृथ्वीराज बोरकर व इतर शिक्षक यांनी शिवदास माहिती आरोग्य पथकाला देव्यून सहकार्य केल्यामुळेच शिवदास ला आता दृष्टी मिळून हे जग पाहता आले आहे. तसेच आजी आजोबा व वडील यांचे चेहरऱ्यावर नातवाला आता कुणावर ही अवलंबून न राहता आपले पुढील जीवन जगता येईल याचा आनंद झळकत होता .
0 Comments