surjagad सुरजागड लोहखनिज प्रकल्पात काम करणा-या आदिवासी कर्मचा-यांना उच्च नोकरीसाठी लायड्स मेटल अँड एनर्जी कंपनी तर्फे बाहेर राज्यात प्रशिक्षण

प्रशिक्षणाकरिता पहिल्या टप्यात  206 कर्मचारी 



गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लोहखनिज प्रकल्पात स्थानिक आदिवासी बांधव काम करीत आहेत. प्रकल्पात काम करणा-या आदिवासी कर्मचा-यांना उच्च नोकरी मिळावी यासाठी लायड्स मेटल अँड एनर्जी कंपनीने पुढाकार घेऊन विविध क्षेत्रात पारंगत होण्यासाठी बाहेर राज्यात प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात आले आहे.  नागपूर व मध्यप्रदेश येथील छिंदवाडा येथील प्रशिक्षण केंद्रात पहिल्या टप्प्यातील 206 कर्मचा-यांना पाठविण्यात आले आहे.  

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणा-या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर लोह खनिज उत्खनन सुरू करण्यासाठी प्रशासनाला तब्बल दोन दशके वाट पहावी लागली.  खनिकर्म विभागाकडून रितसर परवानगी देण्यात आली. सुरजागड लोह प्रकल्पामध्ये चांगल्या  प्रकारचे कामगार तयार करण्याकरिता याच भागातील स्थानिक कर्मचा-यांना नवीन (उच्चं )  नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी लायड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी मार्फत हजारो कर्मचाऱ्यांना वेगवेगळे  प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी नागपूर येथे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आले आहे. यात अग्निशमन प्रशिक्षनासाठी 39 व हलक्या वाहतुकीसाठी 53,  छिंदवाडा येथील प्रशिक्षण केंद्रात  हाटेल मॅनेजमेंटसाठी 26 आणि तुमसर प्रशिक्षण केंद्रामध्ये उत्खनन कामगार म्हणून 17, वेल्डर 5, डोझर आपरेटर 10, इलेक्ट्रीशन साठी 31 आणि  इतर 25  प्रकारच्या पहिल्या व दुसऱ्या टप्यातील असे एकूण 206 प्रशिक्षणार्थीना तयार होण्यासाठी आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील गरजू युवकांना पाठविण्यात कंपनी ने पाहुल उचलले आहे. पुन्हा गरज पडल्यास अनेक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बाहेर पाठवून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम देणार असल्याचेही  कंपनीने म्हटले आहे. स्थानिक आदिवासी शेकडो  महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून  देणार असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे.

Post a Comment

0 Comments