साज्यावर अनुपस्थित असणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी



गडचिरोली : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान सात बारा आणि रहिवासी दाखल्याची आवश्यकता शेतकऱ्यांना आहे. मात्र अनेक साज्यांवर तलाठी गैरहजर असल्याने इच्छुक उमेदवारांना सात बारा आणि दाखले मिळण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. याला जबाबदार असणाऱ्या तलाठ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रथमच सामान्य शेतकऱ्यांना उमेदवार म्हणून उभे राहता येणार असल्याने अनेक शेतकरी या निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत. सेवा सहकारी संस्था किंवा ग्रामपंचायत सदस्य नसलेल्यांना किमान दहा आर शेतीचाध सात बारा आणि रहिवासी दाखला नामनिर्देशन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक साज्यांवर तलाठी वेळेवर हजर नसल्याने शेकडो इच्छुक उमेदवारांना सात बारा आणि रहिवासी दाखले 
तलाठ्यांकडून मिळू शकलेले नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवार आणि सोमवारला तलाठ्यांना साज्यांवर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच जे तलाठी साज्यांवर गैरहजर राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, रमेश चौखुंडे, प्रदिप आभारे, गंगाधर बोमनवार, तुकाराम गेडाम, चंद्रकांत भोयर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments