बलात्कार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा : शेकापच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांची मागणी




गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर आलापल्ली येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाचा तपास करुन आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मेलव्दारे सादर केलेल्या निवेदनात जयश्री वेळदा यांनी म्हटले आहे की, आलापल्ली बलात्कार प्रकरणात सहभागी आरोपी हे धार्मीक व जातीय तेढ निर्माण करणा-या संघटनेशी संबंधीत असल्याचे बोलल्या जात असल्याने आरोपींवर बलात्कार, बाल लैंगिक शोषण कायद्यासह ॲक्ट्रोसिटी एक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच या निषेधार्ह प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग आहे काय? याचाही तपास करावा, अशीही मागणी जयश्री वेळदा यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments