गडचिरोली : शेतकरी कामगार पक्षाचा ७६ वा वर्धापन दिवस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे यांच्या हस्ते भर पावसात ध्वजारोहण करुन लाल बावट्याला सलामी देण्यात आली.
यावेळी जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, तुकाराम गेडाम, सरपंच दर्शना भोपये, देवेंद्र भोयर, तितिक्षा डोईजड, दिक्षा रामटेके, छाया भोयर, चंद्रकांत भोयर, विनोद मेश्राम, देवानंद साखरे, विजया मेश्राम, पुष्पा कोतवालीवाले, यशवंत मुरकुटे, राजकुमार प्रधान, हिराचंद कोटगले, योगाजी चापले, भीमदेव मानकर, गणेश बोबाटे, रामदास आलाम, महेंद्र जराते, बाबुलाल रामटेके, गायत्री मेश्राम, सुरज ठाकरे, दामोदर चुधरी, रेवनाथ मेश्राम, शुल्का बोबाटे, संगिता बोदलकर, अस्मिता लाटकर, धारा बन्सोड, कुसूम नैताम, गिता प्रधान, काजल पिपरे, मंगेश जराते, संतोष गेडेकर यांचेसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
0 Comments