खासदार अशोक नेते यांची ख्रिस्तांनद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे भेट




ब्रह्मपुरी :  गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते हे दिल्ली अधिवेशन आटपून गडचिरोली ला येत असतांना ब्रह्मपुरी येथील माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे सोशल मीडिया संयोजक अविनाश मस्के हे काल दिनांक ११ ऑगस्ट २०२३ ला रात्री १०.०० वा.च्या दरम्यान घरी झोपेला आराम करायला खाटेवर जात असतांना घरच्या फरशीच्या खाली अचानक पणे विषारी सापाने सर्पदंश केल्याने त्यांना  ख्रिस्तांनद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे भरती करण्यात आले.

 यासंबंधीची संपुर्ण माहिती माजी आमदार प्रा.अतुलभाऊ‌ देशकर यांनी खासदार अशोक नेते यांना दिली असता लगेच याविषयी   तात्काळ गांभीर्यपूर्वक लक्षवेधुन खासदार अशोक नेते यांनी  ख्रिस्तांनद हॉस्पिटला जाऊन  भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत हॉस्पिटलचे मेन इन्चार्ज फादर यांच्यासोबत सुद्धा चर्चा करून त्यांच्या तब्येतीची काळजी व आरोग्याची काळजी घेणेसंबंधी खासदार अशोक नेते यांनी  सूचना केल्या.

त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते,माजी आमदार तथा लोकसभा संयोजक प्रा. अतुल भाऊ देशकर,शहर अध्यक्ष अरविंद नंदूरकर, साकेत भानारकर, युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर, प्रा. अशोक सळवंतकर, मोरेश्वर मस्के, धीरज पाल,उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments