सावली: तालुक्यातील हिरापुर येथील भाजपाचे जेष्ठ नेते दौलतराव भोपये यांच्या पत्नी स्वर्गीय.वनिता भोपये यांचे काल दि 25 आकस्मिकपणे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अत्यंविधी कार्यक्रम आज 26 ऑगस्टला हिरापूर येथील स्मशानभूमीत पार पडला. त्यांच्या अंत्यविधीला खासदार अशोक नेते, माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांंनी भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.
या भावपुर्ण श्रध्दांजलीचे अध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाले, एखादी आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा अचानकपणे आपल्याला कायमचे सोडून देवाघरी जातात तेव्हा ते आपल्याला डोळ्यांनी कधीच दिसत नाहीत फक्त आपल्या सोबत उरतात त्यांच्या आठवणी.आज निघुन गेल्याची खंत खासदार अशोक नेते यांनी व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
भावपुर्ण श्रद्धांजली सभेला उपस्थितीत खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु,जनजाती मोर्चाचे अशोक नेते,माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर,ब्रम्हपुरी विधानसभा विस्तारक प्रा.कादर शेख सर,ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल,माजी बांधकाम सभापती संतोष भाऊ तंगडपल्लीवार, ता.महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर,जेष्ठ नेते प्रकाश पा.गड़्डमवार,जेष्ठ नेते देवराव सा.मुद्दमवार,जेष्ठ अरुण पाल, माजी उपसभापती रविंद्र बोल्लीवार,युवा. तालुकाध्यक्ष विनोद धोटे,मोतीराम चिमुरकर, किशोर वाकुडकर,दयाकर पा.गड़्डमवार, तसेच मोठ्या संख्येने अत्यंविधीला नागरिक उपस्थित होते.
0 Comments