अण्णा हजारे विचारमंच तर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांचा सत्कार




गडचिरोली :  डॉ. प्रमोद खंडाते यांची गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक  पदावर दुसऱ्यांदा  नियुक्ती झाल्याबद्दल अण्णा हजारे विचारमंच जिल्हा- गडचिरोली चे जिल्हा प्रमुख बसंतसिंह बैस व इतर पदाधिकारी यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला. 

डॉ.  प्रमोद खंडाते यापूर्वी दिनांक २२/०८/२०१४ ते १४/०६/२०१८ पर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर असताना जनतेच्या आरोग्याकडे विशेष लक्ष घालून डॉक्टर चमू कडून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून दिली.  सामान्य रुग्णालयातील आरोग्याविषयी, लागणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहिले. अण्णा हजारे विचार मंचच्या  पदाधिकाऱ्यांनी जिल्हयात मेडिकल कॉलेजसाठी व जिल्ह्यातील बेरोजगार सुशिक्षितांना आरोग्य सेवेत संधी द्यावी, यावर चर्चा करण्यात आली. 

डॉ. प्रमोद खंडाते यांनी आदिवासी बहुल  गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवेचा चांगला लाभ देता यावा, गोर-गरीबांना मोफत उपचाराची सोया कशी उपलब्ध करून देता येईल. यासाठी शासनाशी पत्र व्यवहार करून आरोग्याविषयी मार्गदर्शन मागविण्याचा  सातत्याने प्रयत्नरत राहीन, असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी  झाडापापडाचे सरपंच रामभाऊ नाईक,  अण्णा हजारे विचारमंचचे जिल्हा उपप्रमुख अनुरथ निलेकार, जिल्हा सचिव देवेन्द्र ब्राम्हणवाडे, तालुका प्रमुख तुलाराम नैताम, तालुका सचिव नरेंद्र पोवनवार, जिल्हा सदस्य कोमेश कत्रोजवार, राजाराम ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments