Baburav shedmake मालदुगी येथे वीर बाबुराव शेडमाके शहिद दिवस साजरा





कुरखेडा :1857 च्या उठावातील गडचिरोली चंद्रपुर जिल्ह्यातील क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके यांनी जंगोम सेना उभारून इंग्रजांविरुद्ध जल,जंगल व जमीन वाचविण्यासाठी जो उठाव केला त्याच्या बदलात इंग्रजांनी त्याला 21 आक्टोबर 1858 ला चंद्रपुर येथील पिंपळाच्या झाडावर जाहीर फाशी दिली;अश्या क्रांतिकारकाला नमन करण्यासाठी गोंडवाना गोंडी संस्कृती बचाव समिती मालदुगी च्या वतीने शनिवारी ला कार्यक्रमाचे आयोजन करून श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आकांक्षा नैताम तर प्रमुख पाहुणे उपसरपंच अन्नाजी नैताम, श्रीराम नैताम,नंदकिशोर नैताम, यादव तुलावी, पांडुरंग तुलावी, किर्तीप्रेम सहारे, संदिप गाथे,लिलाधर नैताम,सुनंदा मडावी,मारोती मडावी, देवेंद्र सिडाम, वच्छला नैताम, शशिकला नैताम, सुमन नैताम, जमुना तुलावी आदि मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रथम कोया पुनेम ध्वजारोहण करण्यात आले व वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला मालार्पन करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रजत करंगाम, सावन नैताम, विलास तुलावी, प्रविन नैताम, लोमेश तुलावी, सुषमा नैताम, पलक नैताम, सुहाना नैताम, देव्यांशी नैताम, चिन्मय तुलावी, वेदांत नैताम, ॠषभ नैताम,नमन नैताम,देवेंद्र धुर्वे, विनायक तुलावी, मानसी नैताम, अतुल तुलावी आदिनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments