आंदाेलनाचा सातवा दिवस; निलंबनाची कारवाई हाेइस्ताेवर आंदाेलन मागे घेणार नाही
गडचिराेली ः तालुक्यातील आंबेशिवनी येथे कार्यरत वनरक्षक राजेश दुर्गे यांनी नियमांना डावलून कागदाेपत्री संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे गठन केले. समितीच्या बॅँक खात्यात श्यामाप्रसाद मुखर्जी याोजनेअंतगर्गत आलेल्या निधीतून लाखाे रुपयांची खरेदी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला असल्याचा आराेप करीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा आंबेशिवनीचे उपसरपंच याेगाजी कुडवे यांचे वनसंरक्षक कायार्यालयासमाेर 5 ऑक्टाेबरपासून आंदाेलन सुरू आहे. आंदाेलनाच्या सातव्या दिवशी 11 ऑक्टाेबरला दुपारी ढाेल बजाओ आंदाेलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
ढाेल बजाओ आंदाेलनात सामाजिक कार्यकर्ते याेगाजी कुडवे, रवींद्र सेलोटे, वीलास भानारकर्, चंद्रशेखर सिडाम, निलकंठ संदाेकर, आकाश मट्टामी, धनंजय डोईजड, अमोल झंजाळ, विलास धानफोले, रवींद्र धानफोले, सुनील बाबनवाडे, तुळशीदास मेश्राम, मोतीराम चंद्रगिरे, मुरली गोडसुलवार आदी उपस्थीत हाेते.
निलंबनाची कारवाई हाेइस्ताेवर आंदाेलन मागे घेणार नाही
वनरक्षक दुर्गे यांच्या मनमानी कारभाराला वरिष्ठ अधिकार्ऱ्यांचे पाठबळ मिळत असून दुर्गेंवर अधिकारी मेहरबान आहेत. त्यांच्याच आशिर्वादांने कारवाईस विलंब हाेत आहे. मात्र, वनरक्षक दुर्गे यांच्यावर निलंबनाची कारवाई हाेणार नाही, ताेपर्यंत आंदाेलन सुरूच राहणार असून आंदाेलन अधिक तीव्र करण्याचा ईशाराही आंबेशिवनीचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते याेगाजी कुडवे यांनी दिला आहे.
0 Comments