गडचिरोली : चातगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आंबेशिवणी येथे कार्यरत वनरक्षक राजेश दुर्गे यांनी ग्रामसभेला विश्वासात न घेता स्वमजिने कागदोपत्री वनव्यवस्थापन समिती गठीत करून धनादेशदवरे गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आज दिनांक १६ ऑक्टोंबरला वनविभागाने एक पत्र काढून राजेश दुर्गे यांना निलंबित केले.
सामाजिक कार्यकर्ते तथा आंबेशिवणीचे उपसरपंच योगाजी कुडवे यांनी ५ ऑक्टोंबर पासून आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत dcf यांनी आंदोलनाच्या १२ व्या दिवशी निलंबन केले.
कुडवे यांच्या नेतृत्वात २० ते २५ कार्यकर्त्यांसह ५ ऑक्टोंबर पासून आंदोलन सुरू करण्यात आले होते. भिक मांगो, ढोल बाजाओ, अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर अखेर आंदोलनाची दखल घेत वनविभागाने राजेश दुर्गे यांच्या निलंबनाचा आदेश काढला.
या आंदोलनात रवींद्र सेलोटे, आकाश मत्ट्टामी, नीलकंठ संदोकर, चंद्रशेखर सिडाम, विलास भानारकर, विलास धानफोले, रवींद्र धानफोले, अमोल झनजाड, धनंजय डोईजड, सुनील बाबनवाडे, मोतीराम चंद्रगिरे, मुरली गोडसुलवार, तुळशीराम मेश्राम , दिलीप झंजाड, होनाजी झंजाड आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 Comments