खा. अशोक नेते यांच्या वाहनाला अपघात Ashok nete


- नागपूरजवळील विहिरगाव येथे ट्रकची धडक


गडचिरोली : नागपूरवरुन गडचिरोलीकडे परत येत असतांना गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खा. अशोक नेते यांच्या वाहनाला भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याची घटना आज, 4 नोव्हेंबर रोजी नागपूरजवळील विहिरगावजवळ घडली. सुदैवाने या अपघातात खा. नेते यांच्यासह चालक व सुरक्षारक्षक बालबाल बचावले.

सविस्तर वृत्त असे की, खा. अशोक नेते मुंबईवरून 3 नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास नागपूरला पोहोचले. येथे मुक्कामी राहिल्यानंतर सकाळी ते आपल्या वाहनाने एम. एच. 33 9990 गडचिरोलीकडे निघाले होते. दरम्यान सकाळी 10.20 वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील विहिरगावजावळ समोरचे ट्रक अचानक आडवे आल्याने दोनही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसली. यावेळी खा. नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. यानंतर दुसऱ्या वाहनाने खा. नेते गडचिरोलीत पोहचले. अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी खा. नेते यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली असता त्यांनी आपण सुखरुप असून काळजी करु नये, असे सांगितले.

Post a Comment

0 Comments