'त्या' डॉक्टरची कारागृहात रवानगी


- आलापल्ली शहरातील घटना



गडचिरोली : खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या मुलीला 'बॅड टच' करणा-या आलापल्ली येथील डॉक्टरला अहेरी पोलिसांनी 26 नोव्हेंबरला अटक केली. सदर डॉक्टरला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संतोष मद्देर्लावार असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

डॉ. संतोष मद्देर्लावार याचे आलापल्ली शहरात खाजगी रुग्णालय आहे. अहेरी तालुक्यातील 17 वर्षीय युवती 26 नोव्हेंबर रोजी डॉ. मद्देर्लावार यांच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. दरम्यान, डॉक्टरने रुग्ण युवतीला आपल्या खोलीत बोलावून बॅड टच केला, असा आरोप युवतीने केला. 

नातेवाईकांसह पीडित मुलीने थेट अहेरी पोलिस ठाणे गाठून डॉ. मद्देर्लावार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून अहेरी पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सोमवारी आरोपी डॉक्टरला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती ठाणेदार मनोज काळबांधे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments