"गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन" (गामा )च्या संयोजकपदी हेमंत डोर्लीकर, संदिप कांबळे




गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील  शासकीय विश्रामगृहात  ६ जानेवारी रोजी पार पडलेल्‍या बैठकीत “गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन” (गामा) च्या संयोजकपदी हेमंत डोर्लीकर व संदिप कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

बदलत्या काळानुसार देशभरात “डिजिटल इंडिया” या संकल्पनेनुसार अनेक कामे डिजिटल झाली आहेत. त्याच बरोबर दैनंदिन घडामोडी, बातम्या याबाबत डिजिटल मीडियाचा व्यापही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातही डिजिटल मीडियाचा व्याप मोठ्या प्रमाणात असून डिजिटल मीडिया विषयी नवनवीन धोरण, कार्यप्रणाली, डिजिटल मीडियाशी निगडित पत्रकारांच्या विविध समस्या व मागण्या शासन दरबारी मांडता याव्यात याकरिता गडचिरोली येथे ‘गडचिरोली ऑल  मीडिया असोसिएशन’ या संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.

आताच्या घडीला झटपट बातमी पोहचविण्याचे माध्यम म्हणून डिजिटल मीडिया कडे बघितले जाते. कोणतीही घटना अथवा बातमी, घडामोडी झटपट ऑनलाईन प्रकाशित करून वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम डिजिटल मीडियातील पत्रकार तत्परतेने करित आहे. वाचक वर्गाचा सुद्धा ऑनलाईन न्यूज ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतांना दिसत असून वाचकांचा कलही वाढतांना दिसत आहे.
गडचिरोली ऑल डिजिटल मीडिया असोसिएशन ही मागील दोन वर्षांपासून गडचिरोली शहरामध्ये कार्यरत आहे.

त्यांच्या निवडीबद्दल जयंत निमगडे (गडचिरोली वार्ता न्युज),अनिल बोदलकर (एविबी न्युज),उदय धकाते (महाभारत न्युज),किशोर खेवले (लोकप्रवाह न्युज),वेकटेश दुडमवार (गोंडवाना टाइम्स न्युज),(विदर्भ क्रांती न्युज), जगदीश कन्नाके(महाराष्ट्र टुडे न्युज) सचिन जीवतोडे (द गडविश्व), संतोष सुरपाम (संतोष भारत न्युज),मनीष कासरलावार (विदर्भ न्युज एक्सप्रेस), प्रवीण चनावार (वृत्तवाणी), यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments