कॉंग्रेसचे भिक मांगो आंदोलन


क्रीडा संकुलाच्या निर्मितीस निधी देण्याकडे शासनाचे दुर्लक्ष


गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडू आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना अत्याधुनिक क्रीडा संकुल असावे, या उद्देशाने महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना भरीव निधी देऊन क्रीडा संकुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. मात्र शिंदे-भाजप सरकार सत्तेत आल्यापासून क्रीडा स्टेडियमच्या कामास नियमित निधी दिल्या जात नसल्याने क्रीडा संकुलाचे काम रखडले आहे. जिल्हा क्रीडा संकुलच्या कामाला लवकरात लवकर भरीव निधी देऊन सरकारने तातडीने क्रीडा संकुलाचे काम करावे, या मागणीला घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा स्टेडियम गडचिरोली येथे सोमवारला 'भिक मांगो आंदोलन' करून शासनाचे लक्ष वेधले.

नमो चषकच्या नावाने लोकप्रतिनिधींकडून लाखो रुपयांची उधळण करून क्रीडा संमेलन घेतल्या जात आहे. ईडी सरकार सत्तेत आल्यापासून क्रीडा संकुलाच्या कामास निधी मिळत नसल्याने अनेक कामे खोळंबून पडली आहेत. तरीही शासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. जिल्हा स्टेडियमचे मैदान पूर्ण अस्ताव्यस्त पडले असल्याने त्याचा खेळाडू आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-यां युवकांना नाहक त्रास करावा लागत आहे, असा आरोप यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, जिप माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, सहकार सेल अध्यक्ष अब्दुल पंजवानी, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी जिप सदस्य नंदू नरोटे, हरबा मोरे, सुनील चडगुलवार, प्रभाकर कुबडे, सुरेश भांडेकर, दीपक रामने, आय. बी. शेख, ढिवरू मेश्राम, सुभाष धाईत, योगेंद्र झंजाळ, उत्तम ठाकरे, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, ज्ञानेश्वर पोरटे, रामटेके, माजिद सय्यद, जावेद खान, प्रफुल आंबोरकर, मयूर गावतुरे, हेमंत कुमरे, सुदर्शन उंदीरवाडे, सीताराम सहारे, नेताजी गुरनुले सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक आंदोलनात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments