पावसाळी अधिवेशनात आमदार डॉ.देवराव होळी अनेक ज्वलंत प्रश्न मांडणार

 
पत्रकार परिषदेतून दिली माहिती



 गडचिरोली : गुरुवार २७ जुनला  महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू होत आहे त्या अधिवेशनात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी आपल्या विधानसभा क्षेत्रातील जिल्हा विकासाचे विविध ३५ तारांकीत प्रश्न, १७ लक्षवेधी प्रश्न, औचित्याचे ११ मुद्दे व २ अर्धा तास प्रश्न मांडणार असून विविध प्रश्नांना उजाळा देणार आहेत अशी माहिती आज गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील स्थानिक विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

पत्रकार परिषदेला  लोकसभा समनव्यक प्रमोद पिपरे, माजी पंचायत समिती सभापती विलास देशमुख, युवा मोर्चा प्रमुख अनिल तिडके,तालुका अध्यक्ष विलास भांडेकर, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख,जयराम चलाख,साईनाथ बुरांडे यांचेसह युवा मोर्चा चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे हजर होते.

विधानसभा क्षेत्रातील उपसा सिंचन योजनांना निधी उपलब्ध करून देणे, वादळ वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नागरिकांना आर्थिक मदत देणे, वैद्यकीय बांधकामा सोबतच प्रवेश प्रक्रिया सुरू करणे, मार्कंडा देवस्थान येथे विविध बांधकाम करणे, नरभक्षक वाघांचा व हिंसक हत्तीचा बंदोबस्त करणे, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, रस्ते व विविध पुलांचे बांधकाम, विविध प्रश्नांचे माध्यमातून आपण शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार डॉ.  देवराव होळी यांनी सांगितले. यासह आपल्या विधानसभा क्षेत्रातील अनेक ज्वलंत प्रश्न विधान मंडळाच्या पटलावर मांडणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

Post a Comment

0 Comments