योगाजी कुडवे गडचिरोली भूषण पुरस्काराने सन्मानित

 



गडचिरोली : जिल्ह्यात  समाजसेवेचा विडा उचललेले आंबेशिवणी येथील रहिवासी योगाजी कुडवे यांना २९ जूनला हॉटेल तुली एमपेरियाल रामदास पेठ नागपूर येथे पार पडलेल्या शानदार समारंभात 'जनतेचा ध्यास... लोकांचा विश्वास लोकमत गडचिरोली भूषण पुरस्कार २०२४" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते योगाजी कुडवे यांना गडचिरोली भुषण पुरस्कार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा याप्रसंगी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी माजी खासदार तथा लोकमत समुहाचे अध्यक्ष डॉ. विजयजी दर्डा,प्रमुख अतिथी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान, विशेष अतिथी प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर,प्रमुख अतिथी राजकुमार बडोले माजी सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.

योगाजी कुडवे यांना गडचिरोली भूषण पुरस्कार मिळाल्याने गडचिरोली जिल्यात व त्यांच्या स्वगावी आनंद साजरा करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments