शेकापच्या अधिवेशनाला शेकडो कार्यकर्ते जाणार




गडचिरोली : देशाचे आर्थिक धोरणं, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, रोजगार अशा विविध विषयांची शास्त्रोक्त मांडणी करुन सामान्य जनतेच्या हिताचा अजेंडा ठरविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे दर चार वर्षांनी अधिवेशन  आयोजित करण्यात येते. या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे होणाऱ्या या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून पक्षाचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते जाणार आहेत.


            शेतकरी कामगार पक्षाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त २ व ३ ऑगस्टला पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मीणी पॅलेस येथे होणाऱ्या या १९ व्या अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मा.ले.) लिबरेशन चे सरचिटणीस काॅ.डाॅ. दीपांकर भट्टाचार्य यांच्या हस्ते व शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भाई संपतराव पवार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, चिटणीस मंडळाचे सदस्य प्रा.एस.व्ही जाधव, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, बाबासाहेब देशमुख, शेलेंद्र मेहता, प्रा. उमाकांत राठोड, राहुल देशमुख, रामदास जराते, काकासाहेब शिंदे, चंद्रकांत चव्हाण प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

              या अधिवेशनात शेतकरी कामगार पक्षाची मध्यवर्ती समीती,  चिटणीस मंडळ आणि विविध जन आघाड्यांचे पदाधिकारी यांचे निवडणूकीद्वारे नियुक्त्या करण्यात येणार आहेत. त्याकरीता जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, युवक जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर यांच्या नेतृत्वात जिल्हा समीती, तालुका समीती आणि गाव शाखांचे शेकडो पदाधिकारी पक्ष प्रतिनिधी म्हणून हजेरी लावणार आहेत.

Post a Comment

0 Comments