विविध मागण्यांना घेऊन माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी उपोषणावर




पत्रकार परिषदेतून दिली माहिती

गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची अनेक गंभीर समस्या घेऊन दि,२ जुलै पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली.

उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

१) १/४/२०१० मध्ये अहेरी जिल्हा निर्मीतीचा निर्णय शासन दरबारी झालेला आहे. अहेरी जिल्हांतर्गत अप्पर जिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली या चार तालुक्याकरीता देण्यात यावे.
२) अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्य ले-आऊट मध्ये केलेल्या कामाचा निधी, ले-आऊट धारकांकडून वसुली करण्यात यावा.
३) मौजा-अहेरी येथील सर्व्हे क्र. २०७ च्या जमिनीचे मालकी हक्कदारांच्या मय्यतीनंतर खोटे संमती दाखवुन पोट हिस्सा केलेल्या प्रकरणाची व सदर मृत व्यक्तीला जिवंत दाखवुन एनएपी-३४ करीता मागणी केलेल्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

यासह अनेक मागण्यांना घेऊन माजी जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासन उपोषणाची दखल घेऊन काय निर्णय घेते व दोषींवर का कारवाई करते याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments