गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करुन भरपाई द्या: सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी




गडचिरोली : जिल्ह्यात मागील आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून, लाखो हेक्टर क्षेत्र बाधित होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन पीडित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज जिल्हाधिकारी संजय दैने यांची भेट घेऊन जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीची माहिती दिली.

लाखो हेक्टर शेतातील पीक अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झाले आहे. शिवाय अनेक लोकांची घरे आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. त्यामुळे पीक आणि घरे व गोठ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन पीडित शेतकरी व नागरिकांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, शिवाय संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments