गडचिरोली : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनानुदानित शाळा कृती समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाच्या वतीने दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.
तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आंदोलनकर्ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी बोलून तोड़गा काढण्यात येईल, असे आश्वासन तनुश्री आत्राम यांनी दिले.
0 Comments