नाल्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या तिघांचे गावकऱ्यांनी वाचवले प्राण


शॉर्टकटने ओढवले संकट


पाणी वाहत असताना पुलावरून वाहन टाकू नये-जिल्हाधिकारी यांचे पुन्हा आवाहन

गडचिरोली  : नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना गडचिरोलीहून नागपूरला जाणाऱ्या  तिघांवर प्राण गमावण्याची वेळ आली होती. परंतु ही बाब स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळताच त्यांनी तत्परता दाखवून संबंधित तीघांचे प्राण वाचवले. याबाबत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी संबंधित नागरिकांचे विशेष कौतुक केले आहे.
 ही घटना आज सायंकाळच्या सुमारास 7 ते 8 वाजताच्या  दरम्यान घडली. यात मोटरसायकल पुरात वाहून गेली आहे.


सविस्तर वृत्त असे की, आज दिनांक 25 जुलैला  चुरचुरा माल येथे  चुरचुरा-नवरगाव रस्त्यावरील नालावरील पाणी वाहत असताना नागपूर येथील रहिवासी राहुल किशोर मेंढे वय 32वर्ष, आशा किशोर मेंढे वय 65 व त्याचा भाचा दत्तश्री शरद गोडे वय 12 वर्ष  हे तिघे आपल्या दुचाकीने गडचिरोली वरून नागपूर ला जाताना नाल्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अडकून काही अंतरावर वाहत गेले. त्याच वेळी त्यांनी गावातील जवळ असलेल्या लोकांना हाक दिल्याने चुरचुरा येथील तैराक अनिल वामन गेडाम व त्यांचे इतर सहकारी *यांनी जीवाची पर्वा न करता* त्या तिघांचे प्राण वाचविले. त्यानंतर जिल्हा पथके, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती गडचिरोली ची चमू तहसीलदार हेमंत मोहरे, मंडळ अधिकारी रुपेश गोरेवार, तलाठी श्रीमती भुरसे  यांनी त्यांना गावात आणून कृष्णा रेड्डी, निलेश तेलतुंबडे, CHO, आशा स्वयंसेवक, आपदा मित्र, पोलिस पाटील, कोतवाल यांच्या उपस्थितीत  त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यांना  गडचिरोली येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले.

.......
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, जिल्हाधिकारी संजय दैने 

पुलावरून पाणी वाहत असताना कोणतेही वाहन टाकू नये अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे. या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपल्या जीव नाहक धोक्यात घालू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments