गडचिरोली : सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचा हात पुढे केला आहे. नुकतेच त्यांनी गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथे भेट देऊन अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांशी चर्चा करुन परिस्थिती जाणून घेतली. रमेश मेश्राम यांचे घर अतिवृष्टीमुळे पडल्याची माहिती मिळताच तनुश्री आत्राम यांनी मेश्राम यांना आर्थिक मदत केली. शिवाय संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
0 Comments