लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड तर्फे सुरजागड आयरन माईन्स परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा



गडचिरोली : लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडद्वारा संचालित सुरजागड आयरन माईन्स परिसरात स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

के. सथी राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला कार्यकारी संचालक आर. आर. साठपथी यांनी संबोधित केले. याप्रसंगी युनिट हेड सुभासिस बोस, एल. साईकुमार, अरुण रावत, संजय चांगलानी यांच्यासह लॉयड मेटल्स आणि त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर विविध क्रीडा स्पर्धेतील विजेते आणि विभागीय स्तरावर बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments